तेर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यात एनसीडी असंसर्ग आजार योजनेअंतर्गत 1 सप्टेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत ही योजना राबविणार येत आहे.
30 वर्षांवरील नागरीकांची रक्तदाब, मधुमेह,ककरोग(तोंडाचा कर्करोग,गर्भाशय ककरोग, मुख ककरोग,स्तनाचा ककरोग)तपासणी आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या माफत करण्यात येत आहे.रक्तदाब तपासणीसाठी बीपी ऑपरेटन मशिन लागते तर मधुमेह तपासणी करण्यासाठी ग्लुकोमिटर मशिन लागते.तर ककरोगाची लक्षणे रूग्नाला दिसल्यासारखी वाटल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा जवळील ग्रामीण रुग्णालयात पुढील तपासणी संदर्भीत करण्यात येते.यामध्ये ग्लुकोमिटर 1 हजार रूग्णांची तपासणी केल्यानंतर त्या मशिनची क्षमता संपते.रक्तदाब तपासणीसाठी तेर येथे बीपी ऑपरेटन मशिन तपासणी करण्यासाठी एकच मशिन आहे तर रूग्णांची मधुमेह तपासणी करण्यासाठी पण तेर येथे एकच मशिन आहे.तेर येथे मोठ्या संख्येने 30 वर्षांवरील नागरिक असल्याने एवढया नागरीकांची तपासणी केव्हा होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांना तपासणीसाठी साहित्यच नसल्याने तपासणी पूर्ण कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या आठवड्यात जिल्हा आरोग्य अधिकारी यानी बैठकीमध्ये बीपी ऑपरेटन मशिन व ग्लुकोजमिटर मशिन प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र स्तरावर खरेदी मशिन करण्यासाठी सांगितले आहे परंतू अद्यापही मशिन खरेदी करण्यात आलेल्या नाहीत.
-अशोक महामुनी,औषध अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र,जागजी.