लातूर (प्रतिनिधी)- दि .03 ऑक्टोबर 2026 रोजी संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कुल लातूर येथे शालेय मैदानी स्पर्धा पार पडल्या या मध्ये लातूर शहरातील सर्व 14 व 17 वयोगटातील मुलींच्या मैदानी स्पर्धा क्रीडा, युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रिडा परिषद , जिल्हा क्रिडा अधिकारी लातूर दवारा आयोजित करण्यात आल्या होत्या. या मध्ये श्री श्री रविशंकर इंग्रजी लातूर शाळेची चौदा वर्ष वयोगटातील इयत्ता आठवीतील विद्यार्थीनी तुलसी चिट्टमपल्ले हिने गोळाफेक मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले. तसेच थाळी फेक मध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या यशाबदल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कोळगे, सुनंदा कोळगे, प्राचार्या विनया मराठे, कार्यालयीन अधिक्षक आशिष कोळगे क्रिडा मार्गदर्शक व्यंकट बोंबडे पालक कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले व शाळेचे सर्व शिक्षक - शिक्षिका कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन धाराशिव येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
