धाराशिव (प्रतिनिधी)-  नांदेड येथे मायक्रो फायनान्साच्याया प्रतिनिधीने शेतकऱ्यांकडून सक्तीने वसुली करण्याच्या प्रयत्न केल्यानंतर सदर शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतरही आपल्या लोकसभा मतदारसंघातून अनेक शेतकऱ्यांना मायक्रो फायनान्सच्या वसूलीसाठी फोन येत आहेत. त्यामुळे धाराशिव, लातूर, सोलापूर या तिन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना मायक्रो फायनान्सच्या सक्तीची वसूली करणाऱ्या लोकांविरूध्द फौजदारी केस दाखल करा असे सांगितले आहे. अशी माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सोमवार दि. 26 ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस माजी गटनेते सोमनाथ गुरव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सहकारी व सरकारी बँकेने वसुली बंद ठेवली आहे. परंतु मायक्रो फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना पिळून काढत वसूली करीत आहेत. गेल्या दोन दिवसात आपल्याला अनेक शेतकऱ्यांचे फोन आले. असे सांगून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सद्याची दुष्काळी परिस्थिती पाहून तरी या लोकांनी वसूली थांबविणे आवश्यक आहे. मायक्रो फायनान्सचे काही लोक अमानवी पध्दतीने वागत आहेत. त्यामुळे अशा लोकांविरोधात फौजदारी खटला दाखल करणार आहे. संबंधित शेतकऱ्यांने लोकप्रतिनिधी अथवा अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा  असे आवाहनही ओमराजे निंबाळकर यांनी केले. 


26 ते 32 टक्के व्याजदर

मायक्रो फायनान्स ने शेतकऱ्यांना 26 ते 32 टक्के व्याजदाराप्रमाणे कर्ज दिले आहे. ते अत्यंत घातक असून, त्या विरोधात आपण लोकसभेत विधायक सादर करणार असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 


 
Top