परंडा (प्रतिनिधी)- येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिवचे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने व मराठी विभागप्रमुख डॉ.गजेंद्र रंदील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने होते. यावेळी महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ.शहाजी चंदनशिवे, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.अरुण खर्डे, वाणिज्य विभागाचे प्रा.डॉ.संतोष काळे, रसायनशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.अमर गोरेपाटील, प्रा.शंकर कुटे, प्रा. डी.जी.पवार, प्रा. प्रकाश मिसाळ यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. गजेंद्र रंदील यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांची आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाची माहिती दिली. सत्य, अहिंसा, स्वच्छता, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशसेवा या मूल्यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले.तर डॉ.अरुण खर्डे यांनी आभार मानले.


 
Top