उमरगा (प्रतिनिधी)- पहाटे पाच वाजता उठून विना सुरक्षा नागरिकात मिसळून फिरणारा नगरसेवक म्हणून नावलौकिक मिळवलेले नगराध्यक्ष म्हणून उमरग्याचे नगराध्यक्ष किरण गायकवाड यांचा संपूर्ण महाराष्ट्रात बोलबाला झाला आहे. त्यामुळे 'लोकशाही मराठी' न्यूज चॅनलतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'महाराष्ट्रातील आश्वासक युवा नेता पुरस्कार' उमरगा नगरपरिषदेचे नगरध्यक्ष किरण रवींद्र गायकवाड यांना जाहीर झाला असून, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा गौरवशाली पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुण नेतृत्वांचा सत्कार करण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारणे हा अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी क्षण असल्याचे किरण गायकवाड यांनी यावेळी सांगितले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मिळालेला हा सन्मान आपल्यासाठी केवळ एक गौरव नसून, यापुढील काळात जनतेच्या हितासाठी अधिक जोमाने काम करण्याची मोठी ऊर्जा देणारा आहे, अशी भावना त्यांनी नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल उमरगा शहरासह संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे.


 
Top