धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात आजीवन अध्ययन व विस्तार विभाग , डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर,महाविद्यालयाचा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि जिल्हा रुग्णालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराप्रसंगी शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यामध्ये शुगर,बी.पी तसेच डोळे तपासणी , सांधेदुखी इत्यादी तपासण्या करून घेण्यात आल्या,सदर प्रसंगी धाराशिव येथील डॉ.तानाजी लाकाळ, डॉ.स्वराज शेळके, डॉ.हर्षदा पवार, डॉ.श्वेता पवार, यांच्या सह सर्व कर्मचाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभले, यावेळी महाविद्यालय विकास समिती सदस्य नानासाहेब पाटील यांनी, तसेच प्र प्राचार्य डॉ सी आर दापके यांनी आरोग्य विषयक मूलभूत विचार मांडले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ मदनसिंग गोलवाल,आजीवन अध्ययन व विस्तार विभाग प्रमुख डॉ राजा जगताप , प्रा विवेकानंद चव्हाण,प्रा डॉ .अरविंद हंगरगेकर,प्रा माधव उगिले ,एन .सी .सी विभाग प्रमुख डॉ केशव क्षीरसागर यांच्या सह ग्रंथालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभले.सदर शिबीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंबादास मंजुळकर यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाले.


 
Top