धाराशिव (प्रतिनिधी)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच धाराशिव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या 14,17 व 19 वर्ष वयोगटातील मुला, मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल सदरील खेळाडूंचा निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी यशदा उद्योग समूहाचे संस्थापक चेअरमन सुधीर सस्ते, जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, सचिव राजेश महाजन, अनिल बळवंत, शरीफ शेख आदी उपस्थित होते. हे विजेते खेळाडू नांदेड येथे दि. 2 व 4 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विभागीय शालेय तायक्वांदेो स्पर्धेमध्ये धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.या खेळाडूंना धाराशिव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव तथा मुख्य प्रशिक्षक राजेश महाजन, अनिल बळवंत, राम दराडे, स्मिता गायकवाड, माधव महाजन, पुजा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडूंचे जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, उपाध्यक्ष जी. बी. कासराळे, किरण वैद्य, सूर्यकांत वाघमारे, रवींद्र जाधव यांनी कौतुक केले आहे.

यावेळी 14 वर्ष मुले गणेश कडेकर, रणवीर सुर्यवंशी, रोहित गोरे, समर्थ साठे, ओम पाटील, वैभव गायकवाड, संग्राम लोमटे, सात्विक इंगळे, आदीब शेख, स्वराज ठाकर. 14 वर्ष मुली आरोही थोरात, सृष्टी गायकवाड, आराध्या सोनटक्के, अनुष्का कोरे, प्रणवी वायकर, प्रांजल भुतेकर, स्वरा कांबळे. 17 वर्ष मुले  अर्णव ढेकणे, कार्तिक जटनुरे, प्रतीक शिंदे, अली मुलानी, स्वराज कांबळे, ऋत्विक ठाकर. 17 वर्ष मुली संस्कृती नलावडे, संस्कृती कपाळे, ज्ञानेश्वरी कुंभार, तन्वी कोरे, श्रुती अंबार, तेजस्विनी बांगर, मधुरा महाजन, स्वराली पडवळ, दिव्या कोने. 19 वर्ष मुले समर्थ मस्के, अविरत वराडे. 19 वर्ष मुली  वैष्णवी साळुंखे, साक्षी डावकरे या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


 
Top