तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी हैदराबाद येथील भक्त एन. रामकृष्ण राव यांनी त्यांच्या अजसरा होम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने आठ लाख रुपयांची देणगी अर्पण केली.

एन. रामकृष्ण राव यांनी आज श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने लेखाधिकारी संतोष भेंकी व सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे यांनी त्यांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व महावस्त्र देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी लेखापाल सिद्धेश्वर इंतुले, जनसंपर्क अधिकारी दिनेश निकवाडे, तेजस कऱ्हाळे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

 
Top