धाराशिव (प्रतिनिधी)- तरुणांनी सामाजिक प्रश्नांना डोळसपणे पाहुन देश घडवावा असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर सिनेट सदस्य देवीदास पाठक यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगरच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे उद्घाटन देवीदास पाठक यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी पाठक म्हणाले की, आज महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा प्रसंगी आपण एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांचे प्रश्न जाणून घेऊन आलेल्या संकटाला सामोरे जाणे गरजेचे आहे. विशेष करून सामाजिक प्रश्न सोडविण्याची मोठी जबाबदारी तरुणांवर आहे, आपणास संविधानातील हक्क आणि कर्तव्य माहिती असणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.
प्राचार्य डॉ.ए.के मंजुळकर म्हणाले की, स्वतः पासुनच सामाजिक सुधारणा होऊ शकेल, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर आज अनेक गंभीर प्रश्न समोर आहेत त्यामुळे योग्य वेळी योग्य ते शिक्षण गंभीर होऊनच आत्मसात करावे लागेल नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे. याप्रसंगी आजीवन अध्ययन व विस्तार विभाग प्रमुख प्रा राजा जगताप यांनी प्रास्ताविक केले. सदरप्रसंगी प्रा डॉ मदनसिंग गोलवाल, डॉ लक्ष्मण भरगंडे यांनी आपल्या विभागाची माहिती दिली. यावेळी प्रा.डॉ.मंगेश भोसले,प्रा माधव उगिले यांच्या सह सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.अरविंद हंगरगेकर यांनी केले तर आभार प्रा विवेकानंद चव्हाण यांनी मानले.
