धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालय येथील जिल्हा न्यायाधीश आवटे यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. त्यांना निरोप देण्यासाठी जिल्हा विधिज्ञ मंडळाकडुन विधिज्ञ बैठक कक्ष येथे निरोप समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश - 1 ख्वाजा साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.खंडेराव चौरे हे होते.

जिल्हा न्यायाधीश -1 ख्वाजा साहेब यांचा सत्कार ॲड.खंडेराव चौरे यांनी केला. तसेच जिल्हा न्यायाधीश आवटे यांचा सत्कार शाल,श्रीफळ व विठ्ठलाच्या फोटोची फ्रेम देऊन ॲड.खंडेराव चौरे यांनी केला. आपल्या प्रास्ताविकात बोलताना ॲड. खंडेराव चौरे यांनी आवटे यांच्या न्यायदानाची पद्धत व एकूणच कामकाज समाधानकारक असल्याचे सांगत आवटे यांना त्यांनी निरोगी दीर्घायुष्य व कौटुंबिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यानंतर जिल्हा न्यायाधीश आवटे यांनी धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात काम करताना आलेले अनुभव व्यक्त केले. तसेच जिल्हा न्यायाधीश - 1 ख्वाजा यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा विधिज्ञ मंडळा चे सहसचिव ॲड.संजय भोरे यांनी केले तर आभार कोषाध्यक्ष ॲड.नरेंद्र वाघोलीकर यांनी केले.

सदर कार्यक्रमास दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मेढे मॅडम, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर निवघेकर साहेब, मुख्य न्याय दंडाधिकारी सचिन पाटील साहेब, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी करभजन मॅडम, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर कुलकर्णी मॅडम, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर शेळवणे साहेब आदींची उपस्थिती होती. त्यासोबतच जिल्हा विधिज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष ॲड.सुधीर नन्नवरे, उपाध्यक्ष ॲड. सारिका मुंडे, सचिव बाळासाहेब आवड, महिला सहसचिव माधवी उंबरे, महिला प्रतिनिधी अर्चना नवले यांच्यासह सर्व विधिज्ञ बंधू भगिनी उपस्थित होते.


 
Top