तेर (प्रतिनिधी)- राज्यभरातील लाखो भाविक भक्तांसह वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेल्या त्याचबरोबर प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व धार्मिक क्षेत्रातही सर्व दूर प्रसिद्ध असलेल्या तेर ता.धाराशिव येथील वारकरी संप्रदायातील थोर संत संतशिरोमणी श्री संत गोरोबा काकांचा  पायी पालखी सोहळा प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी पंढरपूरातील कार्तिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी 11 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास श्री संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टचे प्रशासक राजेंद्र कानडे व निरीक्षक बाळासाहेब गंगावणे यांच्या हस्ते व वारकरी भाविक भक्तांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे .तरी ज्या भाविक भक्तांसह वारकऱ्यांना पालखी सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे अशा भाविक भक्तांसह वारकऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यक उपाययोजना राबवता याव्यात यासाठी गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टकडे रितसर नोंदणी करण्याचे आवाहन गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टचे प्रशासक राजेंद्र कानडे व निरीक्षक बाळासाहेब गंगावणे यांनी केले आहे.


याठिकाणी होणार पालखी सोहळ्याचा मुक्काम

11 नोव्हेंबरला हिंगळजवाडी,  12 नोव्हेंबरला वरुडा,  13नोव्हेंबरला  धाराशिव,  14 नोव्हेंबरला भातंबरे,  15 नोव्हेंबरला वैराग,  16 नोव्हेंबरला यावली,  17  नोव्हेंबरला खैराव, 18 नोव्हेंबरला अनगर,  19 नोव्हेंबरला रोपळे,  20 नोव्हेंबरला पंढरपूरातील कार्तिक सोहळ्यात श्री संत गोरोबा काकांचा पायी पालखी सोहळा दाखल होणार आहे. त्याचबरोबर पंढरपुरातील संत गोरोबा काका मठातील पाच दिवसांच्या मुक्कामा नंतर मंगळवार दिनांक 24 नोव्हेंबरला पंढरपूर येथील कार्तिक सोहळ्याच्या सांगतेसह गोपाळपूर येथील काल्याच्या कार्यक्रम संपन्न झाल्यावर पालखी सोहळा परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे यात दिनांक 24 नोव्हेंबरला येवती,  25 नोव्हेंबरला खंडोबाचीवाडी,  26 नोव्हेंबरला कुंभेज, 27 नोव्हेंबरला कापसेवाडी,  28 नोव्हेंबरला काळेगाव,  29 नोव्हेंबरलासाकत  पिंपरी,  30 नोव्हेंबरला कौडगाव, 1 डिसेंबरला सांजा,  2 डिसेंबरला काजळा, 3 डिसेंबरला रोजी श्री संत गोरोबा काकां यांच्या पालखी सोहळ्याचे तेर नगरीत सायंकाळच्या सुमारास आगमन होणार आहे.


पालखी सोहळ्यादरम्यान यांची होणार किर्तन सेवा संपन्न 

हभप. आप्पा महाराज जावळे,  हभप. पद्मनाभ महाराज व्यास, हभप. हनुमंत महाराज सुतार,  हभप. महेश महाराज भोरे, हभप. सूर्यवंशी महाराज बिभीषण रेणापूरकर, वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्था तेर,  हभप. स्वरूप महाराज मुसळे,  हभप. उत्तम महाराज चव्हाण,  हभप. चंद्रकांत महाराज शेळके,  हभप. बबन महाराज खपाले,  हभप. पितांबर महाराज येवतीकर, हभप. ऋषिकेश महाराज हाजगुडे, हभप. व्यंकट महाराज मोरे, हभप. नागेश महाराज. घायतीडक,  हभप. राजन महाराज काशीद, वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्था तेर,  हभप. ॲड. पांडुरंग महाराज लोमटे, हभप. काकासाहेब महाराज पाटील, हभप. नवनाथ महाराज चिखलीकर,  हभप. आबा महाराज शिंदे आदि  कीर्तनकाराची श्री संत गोरोबा काकां यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.

 
Top