मुरूम (प्रतिनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागाची कॅडेट भूमिका शेंडगे चा सत्कार करण्यात आला . दिल्ली येथे 01 ते 12 सप्टेंबर 2026 मध्ये पार पडलेल्या थल सैनिक कॅम्प मध्ये फायरिंग स्पर्धेमध्ये तिची मुलीं च्या महाराष्ट्राच्या संघात निवड झाली होती.महाराष्ट्र निदेशालय ,छत्रपती संभाजी नगर ग्रुप,53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर व श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथुन भूमिकाने ऐतिहासिक कामगिरी केली व अनेक रेकॉर्ड तिने आपल्या नावे केले. फायरिंग स्पर्धेत आता पर्यंतच्या एनसीसी च्या इतिहासात छ संभाजीनगर , एनसीसी लातूर व शिवाजी महाविद्यालयाची ती सहभाग घेणारी पहिलीच मुलगी होती आता पर्यंत हे ऐतिहासिक कामगिरी कोणीच केली नव्हती महाराष्ट्राच्या संघात निवड होणारी ती पहिलीच मुलींचा मान तिला मिळाला व महाराष्ट्राच्या संघाला भूमिका ने तिसरा क्रमांक रजत पदक मिळऊन दिले तिने सिद्ध करून दाखवले की कठोर परिश्रम,शिस्त, अनुशासन,वेळेचे भान आणि रात्रंदिवस सराव याच गोष्टी यश मिळवण्यासाठी कारणीभूत असतात यामुळेच तिने दिल्ली येथे महाराष्ट्राचा फायरिंग मध्ये पताका रोवला. जिद्द ,चिकाटी वआत्मविश्वास या गोष्टीचा दैनंदिन जीवनात उपयोग केला तर छोट्याशा गावातून सुद्धा राष्ट्रीय स्तरापर्यंत विजय मिळवता येते हे तिच्या कामगिरीतून दाखवुन दिले.दिल्ली येथे देशातून एकूण 17 एनसीसी निदेशालय ने सहभाग नोंदवला होता या मध्ये महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला त्यामध्ये भूमिका ने शुटिंग मध्ये तिसरा क्रमांक मिळवून महाराष्ट्राचा अभिमान तिने देश पातळीवर गाजवला . छोट्याशा कोरेगाव वाडी येथील गावातुन तिचा प्रवास सुरु होतो सलग चार महिण्यामध्ये जवळपास पंधरा कँप मध्ये सहभाग नोंदवला व दिल्ली मध्ये महाराष्ट्राचा थल सैनिक कँप मध्ये झेंडा रोवला . अनेक रेकॉर्ड ची नोंद या दिल्ली येथील कँपमध्ये नोंदवण्यात आली .मागील सलग चार महिन्यापासून अतिशय खडतर कॅम्पमधून तिने दाखवून दिले की योग्य दिशा मार्गदर्शन, आत्मविश्वास,त्याग,मेहनत, प्रबळ आत्मविश्वास, वेळेचे नियोजन व कामावर निष्ठा असेल तर हे यशापासुन कोणीच रोखू शकत नाही हे तिने तिच्या कार्याच्या यशातून दाखवून दिले . तत्पुर्वी शहरातील बसस्थान का पासुन महाविद्यालया पर्यंत तिची वाजत-गाजत मिरवणुक काढण्यात आली या अभिमाना च्या क्षणी सर्व उमरगावासी उपस्थित होते .तिच्या यशामागे नेहमी खंबीरपणे मार्गदर्शन करणारे 53 महाराष्ट्रात बटालियन एनसीसी लातूर कार्यालयाचे कमान अधिकारी कर्नल संतोष नवगण, प्रशासकीय अधिकारी कर्नल वाय बी सिंग तसेच कॅप्टन डॉ चिट्टमपल्ले ज्ञानेश्वर,यांचे मार्गदर्शन लाभले असून या यशाबद्दल उमरगा परिसरात तिचे सर्व दूर नावलौकिक होत आहे .या यशिस्वेते बदल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष मोरे सर्व संचालक मंडळ प्राचार्य डॉ संजय अस्वले,डॉ पदमाकर पिटले, डॉ विनोद देवरकर ,कॅप्टन डॉ चिट्टमपल्ले ज्ञानेश्वर,प्रा गुंडाबापू मोरे,प्रा शैलेश महामुनी,राजकुमार सोनवणे ,नितीन कोराळे,निळकंठ माने सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका, शिक्षेकेत्तर कर्मचारी, कॅडेटसच्या वतीने अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या .
