उमरगा (प्रतिनिधी)-  मुख्यमंत्र्यांनी एनसीडीसी मधुन आपल्या कारखान्याचे डिस्लरीसाठी व इतर कामासाठी मोठी मदत केल्याने बळकटी मिळाली आहे. राज्यातील सहकारी चळवळ रुजवणे व वाढवणेसाठी, सहकार चळवळ टिकवणेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीची भूमिका घेतली आहे. कारखाना सुरू झाला तेव्हा कार्यक्षेत्रात केवळ 10 हजार टन ऊस होता. दुष्काळी परिस्थितीत ही आज 18 हजार हेक्टर ऊस आहे. ही शेतीमधील क्रांती असल्याचे सांगुन आपला संपूर्ण ऊस आपल्या हक्काच्या कारखान्याला देण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन आमदार बसवराज पाटील यांनी केले.

श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे चेअरमन आमदार बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि.20) कारखाना कार्यस्थळावर खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काशी, श्रीशैल्यम व उजैन पिठाचे विश्वस्त तथा जिल्हा बँकेचे चेअरमन बापुराव पाटील, मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेचे सहअध्यक्ष शरण पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन सादिकसाहेब काझी, संचालक सर्वश्री केशव पवार, शरणाप्पा पत्रिके, विठ्ठलराव बदोले, संगमेश्वर घाळे, राजीव हेबळे, माणिक राठोड, शिवलिंग माळी, ॲड. विरसंगप्पा आळंगे, ॲड. संजय बिराजदार, दिलीप भालेराव, संतराम बिराजदार, मंगलताई गरड, इरम्माताई स्वामी, रोहिणी पाटील, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, उमरगा जनता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराग लड्डा, दिलीप गरुड, मल्लिनाथ दंडगे, सतिश पवार, उल्हास घुरघुरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश गवसाणे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन, श्रध्दांजलीचा ठराव मांडला. विषय पत्रिकेचे वाचन करुन अहवाल वाचन केले. केन अकौंटंट राजू पाटील यांनी सुत्रसंचलन तर संचालक विठ्ठलराव बदोले यांनी आभार मानले. सभेसाठी सभासद, सर्व खातेप्रमुख, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.


 
Top