धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही. पी. एज्युकेशनल कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर रोड,धाराशीव येथे संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील व मार्गदर्शक करण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे माजी राष्ट्रपती, महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती अर्थात शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व महात्मा ज्योतिबा फुले  यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व आणि डॉ. राधाकृष्णन व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाविषयी मनोगत व्यक्त केले. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक असून, त्यांच्या ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते, असा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमास व्ही. पी. एज्युकेशनल कॅम्पसमधील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमातून शिक्षकांविषयी कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यात आला.

 
Top