धाराशिव (प्रतिनिधी)- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या के टी पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स व कॉमर्स येथे कै. के टी पाटील सर यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त व संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त महाविद्यालयात दिनांक ०८ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सदरील रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री शेषाद्री डांगे, उपाध्यक्ष विद्याभारती पश्चिम क्षेत्र, श्री कमलाकर वामनराव पाटील माननीय सदस्य विद्याभारती विभाग कार्यकारणी तथा संचालक लोकसेवा समिती, सतीश रंगनाथराव कोळगे देवगिरी प्रांत कार्यकारणी सदस्य, डॉ.तानाजी लाकाळ वैद्यकीय अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक शासकीय रुग्णालय धाराशिव, डॉ. हर्षल डंबळ संचालक सोलापूर जनता सहकारी बँक, डॉ. सौरभ संजय पाटील सहाय्यक प्राध्यापक शासकीय वैद्यकीय रुग्णालय धाराशिव, डॉ. विवेक कोळगे रक्त संकलन अधिकारी , शासकीय रुग्णालय धाराशिव हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते यावेळी बाप्पांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष शेषाद्री अण्णा डांगे यांनी रक्तदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले तसेच बाप्पांनी संस्थेसाठी केलेल्या कार्याचा त्यांनी उल्लेख केला तसेच प्रमुख पाहुणे कमलाकर पाटील यांनी विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी मानवाला मिळतात परंतु रक्त कोठेही बनत नाही ते आपले शरीरच बनवते व एका रक्ताचा थेंब हा एखाद्याचा जीव वाचवू शकतो असे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले व महाविद्यालयातील १११ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले असून गरजू व्यक्तींना शासकीय रुग्णालय येथून रक्त मिळण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस प्रेमाताई पाटील ,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य सुधीर पाटील, हातलाई शुगरचे चेअरमन अभिराम भैया पाटील, डॉ. तनया अभीराम पाटील, संस्थेचे संचालक श्री संतोष काका कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजित मसलेकर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयात कार्यरत असलेले राष्ट्रीय सेवा योजना या एककातील ५० पेक्षा अधिक स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
