तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यात आले.

शासनाने दुष्काळ जाहीर केला असून दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने तालुक्यात ट्रीगर प्रथमकळ लागू झाल्याने पंचनामे करण्याचे काम चालू आहे.सध्या शेतकरी पाऊस नसल्याने हातची पिकेही गेली व जनावरांच्या चारा व पाण्याचे असे दुहेरी संकटात सापडला आहे . त्यामुळे शासनाकडुन पंचनामे करण्यात येत आहे . आज आलियाबाद शिवारातील पंचनामे करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण, शिवाजी चव्हाण पोलीस पाटील, यशवंतराव चव्हाण, माणिक राठोड,थावरु राठोड, गणपती राठोड, हरीदास चव्हाण,देविदास राठोड, काशीनाथ जाधव, रवि चव्हाण, विनोद चव्हाण, सुनील राठोड, शिवाजी चव्हाण, कृषी सहायक संतोष माने, ग्रामसेवक अविनाश खुटेंगावे,यांच्या सह शेतकरी,महिला उपस्थित होत्या.

 
Top