तुळजापूर (प्रतिनिधी)- कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या तुळजापूर तालुक्यात कृष्णा खोऱ्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कृष्णा खोऱ्यातील पाणीवाटपातून तुळजापूर तालुक्यातील पूर्व भागातील उजवी बाजू पूर्णतः वगळण्यात आली आहे मंगरुळ, कुंभारी, काडगाव, नांदुरी, आरळी, कसईसह अनेक गावांना वगळण्यात आल्याचा आरोप करीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंगरुळ येथे परिसरातील वंचित गावांतील शेतकरी व ग्रामस्थांची सर्वपक्षीय बैठक झाली.
या बैठकीत ‘कृष्णा खोरे पाणी संघर्ष समिती' स्थापन करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. शासनाने पाणीवाटपाबाबत तुळजापूर तालुक्याला न्याय न दिल्यास रास्ता रोको, धरणे आंदोलन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
कृष्णा खोऱ्यातील पाण्याच्या वाटपाचा प्रश्न आधीच राजकीयदृष्ट्या तापलेला असताना आता तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वपक्षीय नेते व शेतकरी एकत्र आल्याने आंदोलनाची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या तालुक्यात पाण्याचा प्रश्न जिव्हाळ्याचा बनला असून, आगामी काळात कृष्णा खोऱ्याच्या पाण्यावरून तालुक्यातील राजकीय वातावरणही तापण्याची शक्यता आहे.
बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी सभापती मुकुंद डोंगरे, माजी उपसभापती चित्तरंजन सरडे, धैर्यशील पाटील, रुबाब पठाण, दिलीप भोकरे, प्रा मोहनकचरे उमेश तांबे दिलीप भोकरे रसिक वाले माजी सभापती शिवाजी गायकवाड अशोक बचाटे विकास सोपासे रसिक वाले अनिल डोंगरे तानाजी बंडगर पवार सुरेश कोकरे विलास सरडे अनिल शिंदे . ज्ञानेश्वर सरडे शहाजी पावले लक्ष्मण पाटील वसंत फुलारी भरत माळी अण्णा मोरे आनंद मोरे उमेश मोरे संतोष चौधरी प्रत्येक यांच्यासह मंगरुळ व परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
