तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा 78 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी पोलिस निरीक्षक बालाजी येवते, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे, सहायक व्यवस्थापक (स्थापत्य) प्रवीण अमृतराव, सहायक व्यवस्थापक (विद्युत) अनिल चव्हाण, धार्मिक व्यवस्थापक रामेश्वर वाले, अनुप ढमाले, अमोल भोसले तसेच मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
