धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री  प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मराठवाड्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकरी, वीजपुरवठा, पीक विमा, कर्जवसुली, शिक्षण, आरोग्य तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध महत्त्वाचे प्रश्न मांडून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.

मराठवाड्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने अनेक भागांत पिके व फळबागांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. तसेच पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी पुरेसा चारा व पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी खासदारांनी केली. 


लोडशेडिंग बंद करा 

या बैठक खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एमएसईबीचे अधिकारी वर्गांना धारेवर धरत आपण किती तास शेतकऱ्यांना वीज देतो, असे विचारले असता अधिकाऱ्याने दिवसा चार तास व संध्याकाळी चार तास वीज पुरवठा करत असल्याचे सांगितले. यावर खासदार राजेनिंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत काही तरी खरे बोलत जावा, असे म्हणत लोडशेडिंगचे रजिस्टर मला दाखवा. यावर मंत्री सरनाईक यांनीपण महावितरणच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी अंतर्गत सुरू असलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी. पीक विम्याबाबत ट्रिगर पध्दत पुन्हा लागू करण्याची मागणी करण्यात आली. 


एमआरआय मशीन बंद

या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एमआरआय मशीन बंद असल्यामुळे अनेक रूग्ण मला फोन करतात. या संदर्भात त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चाकूरकर यांना जाब विचारला. त्यावर डॉ. चाकूरकर यांनी संबंधित कंपनीचे आपण पेमेंट न दिल्यामुळे एमआरआय मशीन बंद असल्याचे सांगितले. यावर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी चाकूरकर यांना धारेवर धरत अधिकारी म्हणून तुमचे काही कर्तत्व नाही का? सदर माहिती आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी वर्ग यांना का दिली नाही? असे म्हणत आजच्या आज एमआरआय मशीन चालू करा असे आदेश दिले. 

 
Top