पुणे (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनातर्फे प्रस्तावित गूळ नियंत्रण कायद्याच्या मसुद्याच्या अनुषंगाने इनोव्हेटीव जॅगरी मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने पुणे येथे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची भेट घेऊन विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. संघटनेचे अध्यक्ष ॲड. व्यंकट गुंड पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही भेट झाली.

यावेळी आगामी गळीत हंगामाचे नियोजन, गूळ पावडर उद्योगाला डिस्टिलरी व इथेनॉल निर्मितीस परवानगी देणे, FRP व MSP यांसह विविध प्रलंबित मागण्यांबाबत आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले. तसेच साखर उद्योगाच्या तुलनेत गूळ पावडर उद्योगाकडे शासनाचे होत असलेले दुर्लक्ष, प्रस्तावित गूळ नियंत्रण कायद्यामुळे उद्योगावर होणारे संभाव्य परिणाम आणि साखर उद्योगाप्रमाणे गूळ पावडर उद्योगालाही शासकीय योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

गूळ पावडर नियंत्रण कायद्याच्या प्रस्तावित मसुद्याबाबत मागील आठवड्यात आयजेएमच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संघटनेचे म्हणणे मांडले होते. या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बैठकीचे प्रास्ताविक संघटनेचे तज्ञ संचालक प्रवीण प्रजापती यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष विजय नाडे, संजय खरात, एकनाथ चाळक, ओंकार खुरपे, ऋषिकेश काळे, दिलीप उढाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top