तुळजापूर (प्रतिनिधी)- अपसिंगा रोडवरील विघ्नहर्ता तरुण मडळ श्री गणरायाची आरती पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली.यावेळी तुळजापूर तालुका पत्रकार संघातील सर्व पत्रकार बांधवांनी एकत्रितपणे श्री गणरायाची आरती करून बाप्पाचे आशीर्वाद घेतला.आरतीनंतर विघ्नहर्ता तरुण मंडळाच्या पदाधिकारी व सभासदांच्या वतीने उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे मनःपूर्वक स्वागत व सत्कार करण्यात आला. तसेच दिनांक 20 रविवार रोजी मंडळाच्या वतीने भव्य वृक्षारोपण व अन्नदान महाप्रसादाचे आयोजन  करण्यात आले आहे. यावेळी पत्रकारांचा सत्कार गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जयेश पांढरे  उपस्थित होते

या अन्नदान महाप्रसादाचा सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन विघ्नहर्ता तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top