परंडा (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील सर्वात मोठे असलेले सिना कोळेगाव धरण जलाशया मध्ये मच्छिमार व्यावसाय करण्यासाठी 2026ते 2031 साला साठी कै. शंकरराव पाटील मच्छीमार सह.संस्था डोमगाव व विविध संस्थेला महाराष्ट्र शासन मच्छ आयुक्त विभागाकडून संस्थेला टेंडर मिळाल्याबद्दल परंडा तालुक्यातील मिञ परिवार विविध मच्छीमार संस्थेचे चेअरमन व सचिव बाबुराव काळे सर,जयदेव बप्पा गोफणे, नानासाहेब मिस्कीन, बालाजी सल्ले ,विजय काळे ,नानासाहेब लष्कर, गुरुदास कांबळे सर्वांचा धाराशिव जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे यांनी सत्कार करून नुतन व्यावसाय साठी शुभेच्छा दिल्या.
विशेष सत्कार लोकनेते कै.बाबासाहेब खरसडे व चेअरमन कै.दिगंबर पवार भोञेकर यांच्या निधनानंतर सुद्धा दुसऱ्या पिढीत राजकीय विराहीत मैञी कायम ठेवत सामाजिक कार्यकर्ते सुनिल भाऊ पवार भोञेकर यांना काही दिवसांपूर्वी पिपरी चिंचवड महानगरपालिका व मजुर शिल्प प्रतिष्ठान वतीने पुणे येथे समाज गौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात आले होते आज सदिच्छा भेट घेत कृषी सभापती भाऊसाहेब खरसडे यांनी सत्कार करुन कौतुक केले.नंतर दोन्ही कै.आण्णा च्या आठवणीला उजाळा दिला.शेवटी सत्कारमुर्ती यांनी खरसडे यांचे आभार मानले.
