धाराशिव (प्रतिनिधी)- यावर्षी पावसाने भयानक ओढ दिल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन या पिकासह उडीद, तुर मुग ऊस, फळबागा ही   पिके  अक्षरशः  वाळून गेली आहेत त्यामुळे  शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे अशी  निर्माण झालेली बिकट परिस्थितीची माहिती  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न  करू तरी  शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असा विश्वास भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

शनिवारी दि 5 रोजी किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी आंबेवाडी ता. धाराशिव येथील सोयाबीन पिकाची पाहणी केली त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत सध्याच्या परिस्थिती विषयी शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत खचुन न जाता राज्यातील महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला. यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य  रामदास कोळगे तालुका अध्यक्ष तथा माजी सभापती नानासाहेब कदम पांडुरंग दरेकर अरुण माने शिवाजी इतबारे माजी सरपंच बालाजी कोळगे अनिकेत कोळगे तेजसिंह कोळगे श्याम भनगे ओंकार कोळगे आदी सह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.


 
Top