उमरगा (प्रतिनिधी)- राज्यात स्पर्धा परीक्षांमधील वारंवार होणारे पेपरफुटीचे प्रकार, भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार, ऑनलाईन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी पोलीस भरतीतील अन्याय तसेच विद्यार्थी-युवकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाने केलेले दुर्लक्ष याच्या निषेधार्थ व विद्यार्थी- युवकांना न्याय मिळावा यासाठी प्रमुख मागण्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय पवार यांनी दिले आहेत.
या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीय शिक्षणमंत्र्याच्या तात्काळ राजीनामा घ्यावा. स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी व गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी. व संबंधित यंत्रणांची जबाबदारी निश्चीत करुन आवश्यक ती कार्यवाही करावी. ऑनलाईन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून पारदर्शक व विश्वासर्ह परीक्षा प्रणाली राबवावी, पोलीस भरती प्रक्रियेतील अन्याय दूर करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा, विद्यार्थी-युवकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा ऑनलाईन ऐवजी कायस्वरुपी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात. असे नमूद केले आहे.
या निवेदनावर अविनाश रेणके, जिल्हा उपाध्यक्ष प्रताप तपसाळे, संगिता सकेंगर, तात्त्याराव माशाळ, संध्याराणी मंडळे, अंड इब्रटिम शेख, सुरेश पवार, यशोधा पवार, इब्राहिम उस्ताद, विजयकुमार थिटे, दिनकर श्रीपती पालल, कोमल गायकवाड, सुधीर गाडे, राजेंद्र पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
