तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामपंचायतने ई टेंडरव्दारे कामे करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य अविनाश आगाशे यांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतकडे केली आहे.

तेर ग्रामपंचायत कार्यालयाकडे येणारा सर्व निधीमध्ये कसलाही गैरव्यवहार होऊ नये करीता ग्रामपंचायत कार्यालयाकडे येणा-या निधीचे सर्व व्यवहार पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक असल्यामुळे ग्रामपंचायतीकडील निधीचे ई टेंडरव्दारे वितरीत होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील निधी ई टेंडरव्दारे वितरीत नाही झाल्यास सदर निधीमध्ये गैरव्यवहार होऊ शकतो.ग्रामपंचायत कार्यालयाने कचरा व पाणी व्यवस्थेकडे लक्ष द्यावे तसेच तेर ग्रामस्थांनी ग्रामसभेदरम्यान एक लाखावरील सर्व कामे ई टेंडर व्दारे करण्याबाबतचा विषय ग्रामसभेमध्ये मांडण्यात आलेला आहे.तरी विनंती की, ग्रामपंचायत कार्यालयाकडे येणारा सर्व निधी ई टेंडरव्दारे वितरीत करण्यात यावा तसे न झाल्यास मी आमरण उपोषणास बसणार आहे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य अविनाश आगाशे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.याच्या प्रति गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी( पंचायत विभाग )जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त संभाजीनगर यांनाही दिलेल्या आहेत.

 
Top