मुरूम (प्रतिनिधी)- भारत शिक्षण संस्था, उमरगा संचलित कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, मुरूम येथे श्री गणेश उत्सवानिमित्त आयोजित ‌‘श्री गणेश व्याख्यानमाले'चे पहिले पुष्प दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी उत्साहात संपन्न झाले.

या प्रसंगी मु. अ. गांधी विद्यामंदिर, केसरजवळगा येथील श्री. बनजगोळे डी. बी. यांनी ‌‘विद्यार्थी दशा व दिशा' या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. विद्यार्थीदशा ही जीवनातील अत्यंत महत्त्वाची अवस्था असून, या काळात योग्य ध्येय निश्चित करून शिक्षण, संस्कार, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा अंगीकार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य इंगोले जी. आर. होते. विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करून उज्ज्वल भवितव्य घडवावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. श्री गणेश व्याख्यानमालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन व प्रेरणा मिळणार असून, या उपक्रमाचे विद्यार्थी व शिक्षकांनी स्वागत केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

 
Top