परंडा (प्रतिनिधी)- राष्ट्रविकासाची नवी परिभाषा मांडणारे, आत्मनिर्भर भारताचे खंबीर नेतृत्व, पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी शहर व तालुक्याच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथे रूग्णांना फळे व मिठाई वाटप करण्यात आली.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड.गणेश खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा नगरसेवक अविनाश विधाते, सरचिटणीस धनाजी गायकवाड, विकास कुलकर्णी, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष प्रमोद लिमकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा चिटणीस यशपाल बनसोडे, अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष दिपक गायकवाड, ॲड. भालचंद्र औसरे, बाबासाहेब जाधव, बाळासाहेब गिरी, दिव्यांग आघाडीचे तानाजी घोडके, वैद्यकीय आघाडीचे डॉ. आनंद मोरे, हनुमंत पाटील, विठ्ठल तिपाले, सारंग घोगरे, सागर पाटील, किरण कवटे, राहुल जगताप, रणजित मिस्कीन, रामदास गुडे, बाळासाहेब गोडगे, सनी अहिरे, धनंजय काळे, गौरव पाटील, संतोष गायकवाड, आकाश मदने, पांडुरंग मुसळे, महिला मोर्चा शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे, जयंत भातलवंडे तसेच इतर मान्यवर आणि रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top