तेर (प्रतिनिधी)- तेर येथील रहिवासी व धाराशिव येथील के. टी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. इम्रान मोईन अहमद मोमीन यांनी औषधनिर्माणशास्त्र (Pharmaceutical Sciences) विषयात पीएच.डी. पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचा आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डॉ.इम्रान मोमीन यांनी ‘Pharmacogenomics and its role in personalized medicine for cardiovascular diseases या महत्त्वपूर्ण विषयावर त्यांनी संशोधन केले आहे.  शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना ‌‘आदर्श शिक्षक पुरस्कार', तर औषधनिर्माण क्षेत्रातील शिक्षण, संशोधन, प्रशिक्षण तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंटमधील योगदानाबद्दल ‌‘प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार 2026'ने गौरविण्यात आले आहे.

डॉ. मोमीन यांच्या नावावर दोन पेटंट्स असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये 12 संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत.  Novel Drug Delivery System   या विषयावर त्यांनी पुस्तक लेखनही केले आहे. विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करत त्यांच्या प्रयत्नातून अनेक विद्यार्थ्यांना देशातील नामांकित औषधनिर्माण कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत.पीएच.डी., संशोधन, अध्यापन आणि विद्यार्थी विकास अशा विविध क्षेत्रांत त्यांनी मिळवलेले यशाबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी तेरचे माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, युसुफ काजी, रिझवान मोमीन, आदित्य शुक्ला, मुदस्सर शेख, नजीब शेख, फाजील मुलानी उपस्थित होते.


 
Top