धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‌‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' प्राप्त झाल्याबद्दल डॉ. किरण झरकर यांचा रुपामाता परिवाराच्या प्रधान कार्यालयात सत्कार करण्यात आला. 

रुपामाता परिवाराचे संस्थापक तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा ॲड. व्यंकटराव गुंड पाटील, लातूर येथील उद्योजक व्ही. पी. पाटील, कार्यकारी संचालक ॲड.अजित गुंड पाटील, रुपामाता अर्बन व मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यनारायण बोधले, मिलिंद खांडेकर, प्रशासकीय अधिकारी विशाल गुंड पाटील व अनिकेत नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी रुपामाता परिवारातील पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर विभागातील आयटीआय क्षेत्राला मिळालेला हा पहिला राष्ट्रीय बहुमान असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. डॉ. झरकर यांनी शैक्षणिक व कौशल्य विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. कौशल्य विकासासाठी ‌‘स्किलबुक' प्रणालीची निर्मिती, ‌‘वंदे मातृशक्ती' या पुस्तकाचे लेखन तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना डॉ. किरण झरकर म्हणाले, “सर्वांच्या आदर्श माता रुपामाता यांच्या प्रेरणेने ‌‘वंदे मातृशक्ती' हे पुस्तक लिहिण्याची संधी मिळाली. त्यांच्या आशीर्वादाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळणे माझ्यासाठी भाग्याचे आहे. संपूर्ण रुपामाता परिवाराचा आणि विशेषतः ॲड.व्यंकट गुंड पाटील यांचा मी मनःपूर्वक ऋणी आहे. त्यांनी माझ्या कार्याला सातत्याने पाठबळ दिले.


 
Top