मुरुम (​प्रतिनिधी)- संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन (दिल्ली), झोन-सोलापूर, मुरूम ब्रँचच्या वतीने आयोजित जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या सभागृहात रविवारी (ता. २७) रोजी रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज व आ. निरंकारी राजपिता रमित जी यांच्या कृपाशिर्वादाने आयोजित या शिबिराचे उद्घाटन सोलापूरचे झोनल प्रमुख इंद्रपालसिंह नागपालजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत गीत मनश्री मोटे यांनी म्हटले.


मानवतेचे सर्वोच्च माध्यम- इंद्रपालसिंह नागपालजी

उद्घाटन प्रसंगी बोलताना इंद्रपालसिंह नागपाल म्हणाले, संत निरंकारी मिशन ‘रक्त नाल्यात नव्हे, तर मानवाच्या नाड्यात व्हायला पाहिजे’ या शिकवणीनुसार कार्य करते. मानवी शरीरातील रक्तात कोणतीही जात, धर्म वा वर्णभेद नसतो. त्यामुळे रक्तदान हे केवळ वैद्यकीय मदत नसून मानवतेचे नाते जोडणारे सर्वोच्च माध्यम आहे. अध्यात्म आपल्याला संकुचित विचारांच्या पलीकडे नेऊन ‘वसुधैव कुटुंबकम्’ची भावना शिकवते.


मानवी सेवा हीच ईश्वर सेवा- चांदभाई तांबोळीजी

दुपारच्या सत्रात झालेल्या सत्संग सोहळ्यात ब्रह्मज्ञान प्रचारक चांदभाई तांबोळी यांनी प्रबोधन करताना सांगितले की, निरंकारी मिशन जात, धर्म आणि प्रांताच्या पलीकडे जाऊन संपूर्ण मानवतेला एकसूत्र बांधत आहे. “मानवता हाच खरा धर्म असून, मानवी सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे,” असे त्यांनी नम्रपणे स्पष्ट केले.

यावेळी हरियाणा येथून वस्त्र मंत्रालयातून सेवानिवृत्त माजी प्रादेशिक व्यवस्थापक डॉ. शिवाजीराव शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव कोरे, रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष कल्लय्या स्वामी, महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे, दमाणी रक्तपेढीचे प्रमुख ललित दंडी, जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे डॉ. प्रतीक माने, पांडुरंग वाघमारे, मनोज चव्हाण, दत्तात्रय भल्ला, सुनील पिसके, ब्रँच मुखी दयानंद साखरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सत्संग सोहळ्याचे सूत्रसंचालन मीरा मोटे यांनी केले. शिबिरामध्ये एकूण ६७ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. रक्तदात्यांना मंडळाकडून भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले. श्रीमती गोपाबाई दमाणी ब्लड सेंटर (सोलापूर) आणि जिल्हा रुग्णालय रक्तपेढी (सोलापूर) यांच्या कर्मचाऱ्यांनी रक्त संकलनाचे कार्य पार पाडले.

चंद्रकांत चव्हाण, कल्लेश्वर पांचाळ, सुरेश कोळी, तुकाराम शेवाळे, रमेश मिनियार, हरिकिशन पवार, सुधाकर नारायणकर, सुधीर पंचगल्ले, हणमंत मंडले, सुरेश मंडले, गुलाब मंडले, परमेश्वर मंडले, लक्ष्मण राठोड, सुभाष घोरपडे, युवराज बनसोडे, हणमंत पोतदार आदींनी पुढाकार घेतला. सेवादल इन्चार्ज बिरू बंदीछोडे, शिवानंद बिराजदार, दत्तात्रेय बोडरे, प्रसाद सुपेकर, विष्णू पवार, गुंडेराव चौगुले, अनुसया नारायणकर, उषा साखरे, गुरुदेवी बोडरे यांनी पुढाकार घेतला. कमल शेवाळे, सुनिता व्हटकर, मुक्ताबाई कोळी, अनिता जामगे आदींनी रक्तदात्यांची व्यवस्था केली. प्रा. डॉ. महेश मोटे यांनी सूत्रसंचालन तर आभार दयानंद साखरे यांनी मानले. या सोहळ्याकरिता जिल्हाभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर, निरंकारी सेवा दल, महापुरुष, माता-बहिणजी, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.


 
Top