तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर - लातूर रस्त्यावरील यमराज चौकात हंगरगा तूळ येथील तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि. 4 रोजी घडली. सदरील युवकास सोलापूर येथे उपचार लिहिले असता रात्री दहा वाजता उपचार चालू असताना तो मयत झाला.
त्याबाबत अधिक माहिती अशी की चेतन गोरोबा चव्हाण 26 राहणार हंगरगा तूळ तालुका तुळजापूर हा दुचाकीवरून शुक्रवारी सायंकाळी हंगरगा तूळ येथून काक्रंबाकडे निघाला असताना यमराज चौकाजवळ दुचाकी स ह मृता अवस्थेत आढळला सदरील तरुणाच्या दुचाकीला धडक दिली हे अन्य अज्ञातवाहन ठोकून पुढे गेले. सदरील तरुण हा वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
