तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील गणेश विहारामध्ये आज तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या हस्ते श्री गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठापण करण्यात आली.

यानंतर तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या हस्ते मंदिर संस्थानमधील कर्मचाऱ्यांना वृक्षांचे वाटप करण्यात आले. यावेळी सहायक व्यवस्थापक जयसिंग पाटील, धार्मिक व्यवस्थापक रामेश्वर वाले, बंडू पाठक, महेंद्र आदमाने, ऋषभ रेहपांडे, ओम खुरुद, अमोल कर्डिले, रविराज गायकवाड, रमेश कवडे, गणेश नाईकवाडी, सचिन साळुंके यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी तसेच भाविक उपस्थित होते.

 
Top