धाराशिव (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेले गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळ, धाराशिव चा महाराजा व मानाचा गणपती म्हणून गणल्या गेलेल्या व 62 वर्षापासून मंडळामध्ये समाज विधायक ,संस्कारयुक्त कार्य, जनजागरण ,जनप्रबोधन शिक्षकाप्रती आदरभाव निर्माण व्हावा, मुला-मुलींच्यावर संस्कारयुक्त जडणघडण होण्यासाठी मंडळ सामाजिक सेवेचे व्रत घेऊन कार्य करीत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिक्षक दिन साजरा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेतून सेवानिवृत्त झालेले छत्तीस वर्ष शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे व सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक, विधायक प्रबोधनात्मक कार्यात कार्यरत असणारे व्हॉलीबॉल चे खेळाडू विलास देशमुख.
छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये मुख्याध्यापक या पदावर कार्य करीत असलेले व संस्कृत विषय अध्यापन करीत असलेले अध्यापक विद्यार्थी प्रिय, मनमिळावू विद्यार्थ्यांच्या भावनांचा कदर करणारे व सध्या कार्यरत शिक्षणाक्षेत्रातअसलेले शिक्षक व्ही के देशमुख या दोघांचा शिक्षक दिनी मंडळाच्या वतीने मंडळाचा शेला श्रीची प्रतिमा व सन्मान चिन्ह श्रीफल देऊन सत्कार सन्मान करण्यात आला.
या दोन आदर्श शिक्षकांच्या शुभहस्ते 120 मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले पहिली ते दहावीच्या या विद्यार्थ्यांना देशमुख या शिक्षकांनी अत्यंत मौलिक शिक्षकाचे कार्य कसे असावे याचे प्रास्ताविकातून मार्गदर्शन केले. प्राध्यापक गजानन गवळी यांनी शिक्षक दिना बद्दलच्या असणाऱ्या संस्कारयुक्त कार्याबद्दलचा उल्लेख केला या दोन्हीही शिक्षकांचा गौरव शिवछत्रपती पुरस्करते राजकुमार दिवटे, संजय पाळणे, काशिनाथ दिवटे, नंदकुमार हुच्चे, विद्या साखरे ,यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमा साठीपोलीस कार्यालयातील पोलीस हवालदार व होमगार्ड उपस्थित होते यांचाही यावेळी समाजामध्ये शांतता सुरक्षितता इत्यादी.संदेश देणारे हे शिक्षकच यांचाही यथोचित मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला . नाईकवाडी, वाघमारे , शिंदे, कोळी इ. विद्यार्थी व लेझीम पटू यांनी लेझीमचा खेळ विविध प्रकार व प्रात्यक्षिक करून शिक्षकांना अभिवादन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वास दळवी ,वरून साळुंखे, सापते बंधू ,मनोज अंजीखाने, दुर्गेश दिवटे,सागर पाळणे, कुणाल श्रीकांत दिवटे बंधू, गवळी बंधू , दहीहंडे बंधू, युवराज हुच्चे ,केदार उपाध्ये इत्यादींनी घेतले यावेळी कार्यक्रमाचे संचलन भालचंद्र हुच्चे यांनी केले. शिक्षक दिन चिरायू होवो राष्ट्रपती राधाकृष्णन, व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारत माता की जय, वंदे मातरम, गणपती बाप्पा मोरया अशा विविध घोषणाने वातावरण दुमदुमून गेले होते. शिक्षक व विद्यार्थी या दोघांनाही भविष्य उज्वलतेच्या शुभेच्छा राजकुमार दिवटे यांनी देऊन आभार मानले.
