धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन मुख्यालय सोलापूर, जिल्हा शाखा धाराशिव यांच्या वतीने जिल्हा परिषद धाराशिव येथील स्थायी समिती सभागृहात संघटनेची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी संघटनेच्या उपाध्यक्षपदी किरण आगाशे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या निवड प्रक्रियेस संघटनेचे जिल्हाध्यक्ष  विजय देशमुख, सचिव  निलेश नायगावकर, प्रमुख मार्गदर्शक पी. वाय. जाधव, सहाय्यक प्रशासन अधिकारी पी. एम. चौगुले तसेच सुहास कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.  अयावेळी बोलताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांनी नवनिर्वाचित उपाध्य किरण आगाशे यांच्याकडून संघटनेची ध्येयधोरणे व विचार सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आणि कर्मचारी हितासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.  नवनिर्वाचित उपाध्यक्ष किरण आगाशे यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, किरण आगाशे यांच्याकडे यापूर्वी प्रसिद्धीप्रमुख पदाची जबाबदारी होती. त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे रिक्त झालेल्या प्रसिद्धीप्रमुख पदावर जिल्हा परिषद मीडिया सहाय्यक नवाज टिनवाले यांची निवड करण्यात आली.

 
Top