धाराशिव (प्रतिनिधी)-  आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित डी. फार्मसी कॉलेज धाराशिव यांच्या वतीने गुरुवर्य कै. केशवराव तुकाराम पाटील यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त आयोजित ढकली व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेमध्ये सहा राज्यांतील 70 हून अधिक संघाने सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेमध्ये धाराशिव व्हॉलीबॉल संघाने विजेतेपद पटकावले आहे.

स्पर्धेत यंदा तब्बल दहा पारितोषिके ठेवण्यात आली होती. विजेत्या संघाला 71,111, उपविजेत्या संघाला 51,111, तृतीय क्रमांकाच्या संघाला 31,111, तर चतुर्थ क्रमांकाच्या संघाला 11,111 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. याशिवाय पाचव्या ते दहाव्या क्रमांकाच्या संघांना प्रत्येकी 5,001 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत धाराशिव व्हॉलीबॉल संघाने विजेतेपद पटकावले. तर सोलापूर पोलीस संघाने उपविजेतेपद, आमेर सोलापूर संघाने तृतीय क्रमांक, तर जेजुरी संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला आहे.

या स्पर्धेच्या आयोजनासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्वेसर्वा सुधीर पाटील, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सीईओ आदित्य पाटील, सरचिटणीस प्रेमाताई पाटील, तसेच हातलाई शुगर्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन अभिराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी डी. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. देशमाने तसेच बी. फार्मसी कॉलेजचे विभाग प्रमुख श्रीकांत देशमुख यांचे विशेष योगदान लाभले. याप्रसंगी जिल्ह्यातील तसेच राज्यातील हॉलीबॉल प्रेमी, समाजसेवक, लोकप्रतिनिधी इतर मान्यवरांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.


 
Top