तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील जिजामाता नगरमधील कष्टकरी युवकांचा समावेश असलेल्या जिजामाता युवा मंचने यंदा 16 फुटी आकर्षक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. नामांकित मूर्तिकारांकडून साकारण्यात आलेली ही भव्य मूर्ती परिसरातील भाविक आणि नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. या गणेशमूर्तीचे नामकरण ‘जिजामाता नगरचा महाराजा' असे करण्यात आले आहे अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवून हे मंडळ यंदाचा गणेशोत्सव दुष्काळाचा भान राखत साजरा करत आहे.
नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष विजय मोठे, उपाध्यक्ष सत्यजित कोळगे, सचिव मनोज पोकळे, कार्याध्यक्ष महेश क्षीरसागर, यश डाके, कोषाध्यक्ष अमोल माने, अकबर शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते गणेशोत्सवाचे नियोजन करीत आहेत. सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबवून उत्सव साजरा करीत आहे.
