धाराशिव (प्रतिनिधी)- श्री. कालिका देवी देवस्थान व श्री. संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर येथे प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी शुक्ल पक्ष श्रावण सोमवार दि. 17/8/26 रोजी यज्ञपवीत धारण करून श्रावणी साजरी करण्यात आली. देवस्थान समिती अध्यक्ष श्री. हनुमंत दीक्षित यांनी यजमान पद भूषविले. देवस्थान समिती सदस्य सुधीर वेदपाठक, मधुकरराव पंडीत, प्रमोद गोविंदपुरकर, मंगेश सातपुते, रोहित फिसरेकर,मुकेश पोतदार, प्रमोद पंडीत, जेष्ठ समाज बांधव राजाभाऊ सातपुते, वासुदेव वेदपाठक, संजय नायगावकर, शिवाजीराव दीक्षित, विनोद नायगावकार,रामदास महामुनी, नंदकिशोर वेदपाठक, पोपटराव दीक्षित आदी समाज बांधव उपस्तिथ होते.
भास्करराव वेदपाठक इर्ले कर यांनी पौरीहित्य केले. अत्यंत उत्साही वातावरणात श्रावणी साजरी करण्यात आली. श्री. संत नरहरी महाराज मंदिराचे विस्तारिकरण करण्यात येत असुन श्री. कालिका देवी व श्री. विठ्ठल रुक्मिणी,श्री. संत नरहरी महाराज यांच्या मूर्तीची लवकरच प्रतिष्ठापना करण्यात येईल. सर्व समाज बांधवाच्या सहकार्यातुन भव्य दिव्य असे मंदिर पूर्णत्वास येत आहे असे देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री.हनुमंत दीक्षित, विश्वस्त श्री.मंगेश सातपुते यांनी सांगितले.
