तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील धनेगाव येथील ज्ञानोबा सुरवसे (90) यांचे रविवार, दि. 10 रोजी दुःखद निधन झाले. या घटनेनंतर अवघ्या आठवडाभरातच त्यांच्या पत्नी यमुनाबाई ज्ञानोबा सुरवसे (80) यांचे शनिवार, दि. 15 रोजी रात्री दुःखद निधन झाले. पतीच्या निधनानंतर अवघ्या आठ दिवसांत पत्नीचेही निधन झाल्याने सुरवसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त होत आहे.
कै. यमुनाबाई सुरवसे यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख विकास जाधव-पाटील यांच्या आत्या होत्या.
