धाराशिव (प्रतिनिधी)- भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त धाराशिव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात 15 ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती.ज्योती पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्यदिनाला अभिवादन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले.ध्वजारोहण कार्यक्रमाला विभागीय वन अधिकारी जे.एम.येडलावर, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक हर्षवर्धन शिंदे,सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी विश्वास करे,तसेच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांचे कार्यालय प्रमुख,अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करत देशाच्या प्रगतीसाठी व कर्तव्यपूर्तीसाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.कार्यक्रमाचे नियोजन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने करण्यात आले.

 
Top