उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील गुंजोटी येथील हजरत हाजी सय्यद मुन्नवर रहेमतुल्ला अलैह दर्गा शरीफ यांचा 624 वा उरूस मुबारक प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांनी दर्गामध्ये जाऊन दर्शन घेतले.
यावेळी उरुस कमिटीचे अध्यक्ष इरफान हमीद मुजावर संयोजक मुनाफ काझी,कमिटीचे सदस्य सर्वश्री मोहिद्दीन मुजावर, तक्की मुजावर ,अश्फाक मुजावर, जुबेर काजी, रहीम मुजावर, हरून मुजावर, मस्जिद मुजावर ,इस्माईल मुजावर, बाबूमिया मुजावर, गौस मुजावर , इमरान मुजावर, आदींच्या हस्ते सन्मानपूर्वक यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रमजीवी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस रामकृष्ण पंत खरोसेकर, विठ्ठल साई साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव बदोले, अनुसूचित जाती मोर्च्याचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष दिलीप भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश आष्टे, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, पप्पू उर्फ अनिल सगर, धनराज दिगंबरे, सदानंद पाटील यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले. यावेळी माजी सरपंच शंकरराव पाटील माजी जी प सदस्य रवींद्र ढंगे, रमेश पाटील शैलेश माळगे हेही उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सोहेल मुतवल्ली यांनी मानले.या उरूस साठी हिंदू मुस्लिम भावीक भक्तगण हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
