धाराशिव  (​प्रतिनिधी)-   संजय तुकाराम शेंडगे राहणार वरुडा ता.जि. धाराशिव यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर बॉटनी डिपार्टमेंट मधून इफेक्ट ऑफ अलगल कम्युनिटी ऑन दि प्रोडक्शन ऑफ ग्लासिन मॅक्स फ्रॉम उस्मानाबाद तालुका.या विषयावर त्यांना पी एच डी  हा बहुमान मिळाला आहे. गेली 8 वर्षं त्यांनी या विषयावर काम केले आहे .

त्याचा फायदा हा शेतकरी वर्गाला भविष्यात होईल असे त्यांनी मत व्यक्त केले आहे. त्याबद्द्ल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.त्याना बॉटनी चे डिपार्टमेंट हेड डॉ अरविंद धाबे  व त्यांचे गाईड अणदूर कॉलेज चे डॉ सुर्यवंशी डी. एस यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

 
Top