परंडा (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी परंडा येथील ॲड. जहीर चौधरी यांची तर भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या धाराशिव जिल्हा चिटणीस पदी यशपाल बनसोडे यांच्या निवडीबद्दल परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीत ॲड. जहीर चौधरी यांची उपाध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.यापूर्वी ॲड.चौधरी यांनी भाजपा परंडा शहराध्यक्ष, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश चिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष तसेच भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केले आहे.भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ भालेराव यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीत जिल्हा चिटणीस म्हणून यशपाल बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे.या दोघांचाही परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात फेटा बांधून, शाल व पुष्पहाराने भाजपा नेते माजी आमदार  सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपा परंडा शहराध्यक्ष उमाकांत गोरे, भाजपा नेते सुखदेव टोंपे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, भाजयुमो शहराध्यक्ष व नगरसेवक अविनाश विधाते, नगरसेवक अकिब पठाण, स्वप्नील तुपे, भाजयुमो तालुका अध्यक्ष अजित काकडे, सारंग घोगरे, ॲड. सलमान तांबोळी, प्रमोद लिमकर, किरण कवठे, धनंजय काळे, गौरव पाटील, मनोज पवार, रामदास गुडे, अप्पा मुसळे, आकाश मदने, तानाजी घोडके, सिद्दीक हन्नूरे, तुषार कोळेकर, ॲड. ज्ञानेश्वर लोखंडे, जोयब हावरे, नजीर बागवान, अस्लम नदाफ, सौरभ शिंदे, रहेमान चौधरी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.


 
Top