धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही. पी. शैक्षणिक संकुल, छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून वंचित, कष्टकरी आणि श्रमिकांच्या जीवनातील वास्तव प्रभावीपणे मांडत सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा दिली, तर लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यलढ्यात जनजागृती करून राष्ट्रभावना जागृत करण्याचे महान कार्य केले, असे यावेळी उपस्थितांनी मनोगतातून नमूद केले.
या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास व्ही. पी. शैक्षणिक संकुलातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनामुळे संकुलात राष्ट्रभक्ती, सामाजिक समता आणि परिवर्तनवादी विचारांचा जागर करण्यात आला.
