कळंब (प्रतिनिधी)- रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीच्या वर्ष 2027-28 या कार्यकाळासाठी अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. व्यंकट अनिगुंठे, तर सचिवपदी विक्रम गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. क्लबच्या नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीत सर्वानुमते ही निवड करण्यात आली.
रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक तसेच विविध लोकोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतात. या पार्श्वभूमीवर डॉ. व्यंकट अनिगुंठे व विक्रम गायकवाड यांच्यावर आगामी कार्यकाळाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिव यांच्या नेतृत्वाखाली कळंब शहर व परिसरात रोटरीच्या सामाजिक कार्याला आणखी व्यापक स्वरूप मिळेल, असा विश्वास रोटरी सदस्यांनी व्यक्त केला. त्यांच्या बिनविरोध निवडीबद्दल कळंब शहरासह विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

