धाराशिव  (प्रतिनिधी) - लोकशाही वृत्तवाहिनीच्यावतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या लोकशाही मराठवाडा संवाद - २०२६ पुरस्काराने बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा धाराशिवचे सुपूत्र धनंजय गंगाधर शिंगाडे यांना सहकुटुंब इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते व लोकशाही वृत्तवाहिनीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती शुक्रवार, दि.८ ऑगस्ट रोजी सन्मानित करण्यात आले आहे. 

छत्रपती संभाजीनगर येथील मंगलम रिसॉर्टमध्ये आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्री सावे आणि लोकशाही वृत्तवाहिनीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील यांच्या हस्ते लोकशाही मराठवाडा संवाद - २०२६ पुरस्काराने धनंजय शिंगाडे यांना गौरविण्यात येते. शिंगाडे हे गेल्या ३५ वर्षांपासून सातत्याने सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील वर्ग - २ जमिनीबाबत आंदोलन उभा करुन ती जमीन वर्ग - १ मध्ये करण्यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा केला. त्यामुळे शासनाने वर्ग - १ जमिनी करण्याचा निर्णय घेतला. या बरोबरच विद्यार्थ्यांना व निराधार यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल शिंगाडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 
Top