धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ उपपरिसरात महराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांची जयंती “जलसंधारण दिन“ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचा प्रारंभ प्रतिमापूजनाने करण्यात आला. सर्वांनी प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. 

विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. रमेश चौगुले यांनी अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी जलसंधारण शपथ सर्वांनी घेतली. जलसंधारण दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रा. डॉ. नितिन पाटील, विभागप्रमुख, जल व भूमी व्यवस्थापन विभाग, यांनी प्रमुख पाहुणे व मुख्य व्याख्याते म्हणून मार्गदर्शन केले. डॉ. सुयोग अमृतराव, विभागप्रमुख, व्यवस्थापनशास्त्र विभाग यांची विशेष उपस्थिती होती. प्रा. डॉ. नितीन पाटील यांनी आपल्या व्याख्यानात जलसंधारणाचे महत्व, पाणी बचत, काटकसरीने वापर, माती वाचवा, पाणी वाचवा, सुरक्षित भविष्य घडवा या बाबतीत विस्तृत मार्गदर्शन केले. पावसाच्या पाण्याचे संधारण, भूजल पातळी वाढविणे, जलस्रोतांचे संवर्धन, पाण्याचा पुनर्वापर तसेच जलप्रदूषण रोखणे या बाबींवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. रमेश चौगुले, संचालक विद्यापीठ उपपरिसर, धाराशिव यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. त्यांनी जलसंधारण हि केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय मनोगतात संचालक, प्रा. डॉ. रमेश चौगुले यांनी जलसंधारणाचे अनेक मार्ग, प्रत्येकाची जबादारी, सुरक्षित भविष्य याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. विक्रम शिंदे यांनी केले, तर प्रा. डॉ. गोविंद कोकणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. मेघश्याम पाटील यांनी परिश्रम घेतले. डॉ. सचिन बस्सये, समन्वयक, कमवा व शिका योजना आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमास विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्यने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

 
Top