धाराशिव :(प्रतिनिधी)- शहरातील संवाददिनी वादनातील किमयागार दिपक लिंगे तेर येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मश्री पंडित सी.आर.व्यास सरांचे शास्त्रीय गायणातील स्थान,त्यांची प्रतिभा आणि त्यांच्या कामाची संपूर्ण भारतभर ख्याती आहे त्यांचेच सुपुत्र सुविख्यात संतुर वादक सुहास व्यास आणि सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक सतिश व्यास ही सगळी प्रतिभावंत गायकांची नामावली याच मातीतील हे सगळे आठवण्याचे कारण असे की याच शहरात मागील पंचेचाळीस ते पन्नास वर्षांपासून संगीत साधना करणारे थोर प्रतिभावंत हार्मोनियम वादक पंडित सी.आर.व्यास.यांचे शिष्य दिपक लिंगे गुरुजी यांना त्यांच्या संगीत सेवेचा सन्मान म्हणून संगीत जगतातील अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या पंडित विष्णू नारायण भातखंडे संगीत रत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
अत्यंत विनम्र, प्रसिद्धी पराडमुख असे गुरुवर्य लिंगे गुरुजीचा हा सन्मान या संपूर्ण जिल्हाच नव्हे मराठवाडा, महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण आहे.आज पर्यंत अनेक दर्जेदार विद्यार्थी घडवत असताना स्वतः बाहेरच्या प्रसिद्धी, झगमगाट,पैसा या पासून स्वतःला अलिप्त ठेवून संगीत साधना करणारे लिंगे सर एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा कलाविष्कार मेलडी स्टार्स , साहित्य भारती धाराशिवच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी मुख्यप्रवर्तक तथा प्रांत संघटनमंत्री साहित्य भारती युवराज नळे , मुकुंद पाटील , धनंजय कुलकर्णी, शरद वडगावकर, शेषनाथ वाघ , नितीन बनसोडे , अनिल मालखरे , राजाभाऊ कारंडे, भैरवनाथ कानडे, समाधान शिकेतोड , अक्षय भन्साळी , सौ. वर्षा नळे ,सौ.सविता भोसले आदि मान्यगण उपस्थित होते .
