धाराशिव (प्रतिनिधी)-  गवळी गल्लीतील, स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेले, धाराशिवचा महाराजा व मानाचा गणपती, म्हणून गणल्या गेलेल्या श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्षाबंधनाच्या या सणाच्या निमित्ताने सीमेवरील वीर जवानांसाठी राखी पाठविण्याचा  कार्यक्रम, उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला.

याही वर्षी “ राख्या पाठवू साऱ्याजनी, आपला सण रक्षाबंधन-वीर जवान देशाचे संरक्षण“ उपक्रमाखाली नारळी पौर्णिमेच्या सणाच्या निमित्ताने ,रक्षाबंधनाच्या या सणाच्या उत्सवाच्या, आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही. आपल्या देशाचे व आपले रक्षण करणाऱ्या सीमेवरील वीर जवानांसाठी राख्या पाठविण्याचा परंपरा जपली. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या शुभहस्ते शुभ संदेश राख्या पाठविण्यास शुभारंभ झाला. 

शिवछत्रपती पुरस्कार राजकुमार दिवटे, प्रा. भालचंद्र  हुच्चे, प्रा.गजानन गवळी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दरवर्षी स्वाधार निवासी मतिमंद आळणी येथील दिव्यांग यांनी बनविलेल्या राख्या खरेदी करून सर्व राख्या श्वेता दिवटे, अलका गवळी, निर्मला गवळी, सुरेखा हुच्चे, साखरे परिवार, वैभवी साखरे, उज्वाला दिवटे, गौरी व इच्छा उपाध्ये, कोरपे, कल्याणी उपाध्ये, ईश्वरी पाळणे, अनुराधा पाळणे, किरकसे, बारस्कर, सई चव्हाण, सुरवसे परी,जानगवळी परिवार, पुष्पा हुच्चे, स्नेहा दिवटे ,सरस्वती व वैभवी अंजीखाने, उषा, शर्मा भाभी  या महिलांनी स्वर्गीय हेमाताई देशपांडे व स्वर्गीय सरोजनी पाळणे यांच्या स्मरणार्थ राख्या पाठवण्यात येतात.  यावेळी वरून साळुंखे, विश्वास दळवी, दुर्गेश दिवटे, संजय पाळणे, विद्या साखरे ,बसवेश्वर पाळणे, गिरीश पाळणे ,आकाश महामुनी, वैभव मनोज अंजीखाणे, युवराज हुच्चे, मंडळाचे पदाधिकारी, गणेश भक्त आदी उपस्थित होते. 


 
Top