भूम (प्रतिनिधी)-  पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद धाराशिव आणि पंचायत समिती, भूम यांच्या संयुक्त विद्यमाने पशुसंवर्धन विषयक दुग्ध व्यवसाय व शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मल्हार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

बुधवार, दि. 19 ऑगस्ट ते शुक्रवार, दि. 21 ऑगस्टदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत पंचायत समिती सभागृह, भूम येथे हे प्रशिक्षण शिबिर होणार आहे. कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी, भूम यांच्या पुढाकाराने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

तीन दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन, दुग्ध उत्पादन व गुणवत्ता, शेळीपालन व्यवस्थापन, पशु आरोग्य आणि लसीकरण याबाबत शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दुग्ध व्यवसाय व शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असून व्यवसाय अधिक शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी आवश्यक माहिती दिली जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागी शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी भूम तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंचायत समिती सभागृहासमोर मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली.

 
Top