धाराशिव (प्रतिनिधी)- खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ज्येष्ठ नेते संजय निंबाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. आज दुपारी चार वाजता मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी आमदार कैलास पाटील,आमदार प्रवीण स्वामी उपस्थित होते.

नगरपालिका निवडणुकीदरम्यान संजय निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचाही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश झाला आहे. या पक्षप्रवेशासाठी शेकडो कार्यकर्ते मातोश्रीकडे आले आहेत. ही माहिती शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी दिली. संजय निंबाळकर आणि रामेश्वर शेटे राजाभाऊ बागल यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 
Top